बातम्या
इनामतर्फे रस्ते,गटारी स्वच्छता मागणीसाठी महापालिकेस निवेदन सादर
By nisha patil - 3/6/2023 6:53:59 PM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी इचलकरंजी शहरातील रस्ते ,गटार स्वच्छता यासह विविध मुलभूत नागरी समस्या मार्गी लावावी या मागणीचे निवेदन इनाम संघटनेच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की ,१०७ कोटी मंजूर निधीच्या कामांतर्गत
झालेल्या सारण गटारींना डहाळ केला नाही त्यामुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही.पंचवटी टॉकीज जवळील वृंदावन हॉटेलसमोरची गटार, विवेकानंद कॉलनी जवळील रुग्गे कॉलनीतील गटार ही याचीच
प्रातिनिधिक उदाहरणे असून अशाच पद्धतीने बऱ्याच भागात सांडपाण्याचा निचरा होत नाही. ज्या गटारींना डहाळ केला नाही त्यांची पाहणी करून कार्यवाही करावी.सावली सोसायटी जवळील ऑक्सिजन पार्क समोरील मोठ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले असून सदर रस्ता खराब झाला आहे. शहापूर परिसरातील विठ्ठलनगर हमाल गल्ली नंबर ६ परिसरात रस्ते व गटारीच्या दुरवस्थेची समक्ष पाहणी करावी.कृष्णानगर परिसरात मुख्य रस्त्यावर गटार नसल्याने तेथे एक तिरका नळ टाकून पाणी पास केलेले आहे. तू चोकप झाले की पाणी वारंवार रस्त्यावर येवून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
इचलकरंजी शहरातील बऱ्याच सारण गटारी या जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छ करणे आवश्यक आहे.सारण गटारीत प्लास्टिक बाटल्या व इतर प्लास्टिक पडल्यामुळे त्याची स्वच्छता करणे अवघड जात आहे.प्रत्येक सारण गटारीस सिमेंटच्या जाळया बसवून कचरा तेथेच वाट बंद करून फक्त पाणी पास केल्यास स्वच्छता
व्यवस्थेत सुसूत्रता येईल.मदनलाल बोहरा मार्केट परिसरात जाताना डाव्या बाजूस कित्येक महिने कचऱ्याचा ढीग पडला आहे. तो उठाव करणे आवश्यक आहे.काळ्या ओढयातील प्लास्टिक कचरा व इतर साहित्य जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे.या सर्व समस्या त्वरित मार्गी लावाव्यात ,अशीही मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
यावेळी महापालिका उपायुक्त डॉ.प्रदिप ठेंगल यांनी सदर समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल , असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी इनाम संघटनेचे राजू कोन्नूर,नितीन ठिगळे, दीपक पंडित, राम आडकी,जतीन पोतदार, रूपाली माळी,मीना कासार,डॉ सुप्रिया माने,संजय डाके,अमित बियाणी, महेंद्र जाधव, हरीश देवाडिगा,अभिजीत पटवा आदी उपस्थित होते.
इनामतर्फे रस्ते,गटारी स्वच्छता मागणीसाठी महापालिकेस निवेदन सादर
|