बातम्या

राजेश क्षीरसागर यांच्या इशाऱ्यानंतर खड्ड्यांबाबतीत महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर

Municipal administration on action mode regarding potholes after Rajesh Kshirsagar's warning


By nisha patil - 10/8/2024 7:52:50 PM
Share This News:



राजेश क्षीरसागर यांच्या इशाऱ्यानंतर खड्ड्यांबाबतीत महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर

शहरातील खड्डे मुजविण्यास तातडीने सुरवात   

कोल्हापूर दि.१० : अतिवृष्टी मुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरला असला तरी रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यामुळे नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे. अतिवृष्टीचा पूर्वानुभव प्रशासनाकडे असतानाही प्रशासन रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत करत आहे काय? असा सवाल करत नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी काल महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिला होता. राजेश क्षीरसागर यांच्या इशाऱ्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन तात्काळ अॅक्शन मोडवर आल्याचे आज दिसून येत आहे. शहरातील खड्डे मुजविण्यास महापालिका प्रशासनाने तातडीने सुरवात केली आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी एका लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या बैठकीत ३० ऑगस्ट पर्यंतची वेळ प्रशासनाने दिली होती. पण, खड्डे मुक्त शहर ही प्रशासनाची जबाबदारी असून, लोकांचे जीव जाण्याची वाट पाहू नका असा इशारा देत दोन दिवसांचा अल्टिमेटम ही क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. क्षीरसागर यांच्या सुचनेप्रमाणे ज्या ठिकाणी चिखल, दलदलीची परस्थिती आहे त्या ठिकाणी मुरूमाद्वारे खड्डे बुजविण्यात येत असून,  शक्य असेल त्या सर्व ठिकाणी सिमेंट व डांबरीकरणाचे पॅचवर्क करण्यात येणार आहे.
 


राजेश क्षीरसागर यांच्या इशाऱ्यानंतर खड्ड्यांबाबतीत महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर