बातम्या

थकबाकीदारांवर महापालिका घरफाळा विभागाची कारवाई

Municipal housing department action against defaulters


By nisha patil - 10/1/2025 2:49:55 PM
Share This News:



थकबाकीदारांवर महापालिका घरफाळा विभागाची कारवाई

  कोल्हापुर शहरातील थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करुनही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे घरफाळा विभागाने चार व्यावसायिक मिळकत धारकांची रक्कम १२ लाख, ९७,७३१ थकीत असुन या मिळकतीं सील करण्याची कारवाई करण्यात आलीय.

कोल्हापुर शहरातील थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करुनही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे घरफाळा विभागाने १३ लाखाच्या थकित घरफाळ्यापोटी शहरातील चार व्यावसायिक मिळकती सिल केल्या आहेत. विभागीय कार्यालय क्र. २ अंतर्गत जोतिबा रोड परिसरामधील श्री. संत नरहरी सोनार सहकारी पतसंस्था विभागीय कार्यालय क्र. ३ राजारामपूरी अंतर्गत राजारामपूरी ०८ वी गल्ली येथील मोहिनी मोहनराव जाधव मोहिनी मोहन जाधव व १० वी गल्लीं परिसरातील कडोलीकर अशा ४ व्यावसायिक मिळकत धारकांची रक्कम सुमारे १२ लाख, ९७,७३१ थकीत आहे त्यामुळे या मिळकतीं सील करण्याची कारवाई करण्यात आलीय.


थकबाकीदारांवर महापालिका घरफाळा विभागाची कारवाई
Total Views: 43