खासबाग मैदानाबाबत महापालिका अधिकारी धारेवर
By nisha patil - 3/8/2023 6:23:43 PM
Share This News:
कोल्हापुरातील राजर्षी शाहू खासबाग मैदान आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारतीची मोठ्या प्रमाणात नादुरुस्ती झाली आहे. शासनाकडून या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मिळाला मात्र मिळालेला निधी नेमका कुठे खर्च केला असा सवाल उपस्थित करत जिल्हा व शहर कृती समिती आणि मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. दहा दिवसांपूर्वी खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला मात्र महापालिका प्रशासन या ऐतिहासिक ठेव्याकडे अजूनही गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला. कोल्हापूर शहरात महापालिकेच्या स्वनिधीतून तसच केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून जी विकास काम सुरू आहेत, ती दर्जेदार साहित्य वापरूनच करावीत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल . असा इशारा कृती समितीनं दिलाय . येत्या १० ऑगस्टरोजी कृती समितीसोबत राजर्षि शाहू खासबाग कुस्ती मैदान आणि केशवराव भोसले नाट्य गृह, या दोन्ही वास्तूंची प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी आणि शहानिशा करून, याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगितलं राजर्षी शाहूंच्या ऐतिहासिक कार्याची जपवणूक करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे यावेळी मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते दत्तात्रय ठाणेकर यांनी सांगितले.
खासबाग मैदानाबाबत महापालिका अधिकारी धारेवर
|