शैक्षणिक
मुरलीधर गावडे यांचा सेवागौरव समारंभ संपन्न
By nisha patil - 6/3/2025 2:22:18 PM
Share This News:
मुरलीधर गावडे यांचा सेवागौरव समारंभ संपन्न
कोल्हापूर, दि. 6: भारतीय आयुर्विमा महामंडळ (एल.आय.सी.) शाखा 94 एलच्या 6826 क्रमांकाच्या सर्व विमा प्रतिनिधींच्या वतीने विकास अधिकारी मा. मुरलीधर गावडे यांच्या सेवागौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना मा. मुरलीधर गावडे म्हणाले, "माझ्या वडिलांचे मार्गदर्शन, मित्रपरिवाराचे सहकार्य आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच मी 35 वर्षांची सेवा प्रामाणिकपणे पार पाडू शकलो. एल.आय.सी.मुळे मला उत्तम माणसे लाभली आणि जनसंपर्क वाढला. सेवानिवृत्त होत असलो तरी एल.आय.सी.चा एक अविभाज्य भाग म्हणून राहीन."
समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक नानासाहेब पाटील (माजी मुख्याध्यापक, श्रीमंत माईसाहेब बावडेकर विद्यालय, कोल्हापूर) यांनी केले. त्यांनी गावडे यांच्या कार्याचा गौरव करताना "प्रामाणिक सेवा हेच यशाचे गमक आहे" असे सांगितले.
कार्यक्रमाला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, हितेंद्र साळुंखे, प्रदीप गिजरे, सौ. सुवर्णा पाटील उपस्थित होते. गावडे दाम्पत्यांचा शाल, श्रीफळ, पोशाख व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीमती शुभांगी गावडे, कु. गौरव गावडे यांसह अनेक विमा प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. आभार श्री. मनोज शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. सौ. नीता पाटील (ग्रंथपाल) यांनी केले.
मुरलीधर गावडे यांचा सेवागौरव समारंभ संपन्न
|