बातम्या
मशीद संचालक वादातून सदर बाजारात एकावर खुनी हल्ला
By nisha patil - 1/13/2024 6:49:38 PM
Share This News:
कोल्हापुरातील मशिदीच्या संचालक मंडळाच्या वर्चस्वादातून धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात मोहम्मद खान तोता खान पठाण वैभव हे जखमी असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. कोल्हापुरातील सदर बाजार परिसरातील असणाऱ्या एका मशीनच्या संचालक मंडळाच्या वर्चस्ववादातून गेल्या काही दिवसापासून धुसपुस सुरू आहे.
या वादाचा आज भडका उडाला असून आज दुपारच्या दरम्यान तीन ते चार हल्लेखोराने पठाण यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये पठाण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तपास सुरू केलाय. या दरम्यान भर दिवसा घडलेल्या या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मशीद संचालक वादातून सदर बाजारात एकावर खुनी हल्ला
|