बातम्या
मुश्रीफांनी घेतला शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा
By nisha patil - 1/28/2025 2:57:46 PM
Share This News:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या कामांचा आढावा ना. हसन मुश्रीफांनी घेतला व उपस्थित अधिकारी वर्गाला कामकाजाबाबत सूचना दिल्या.ना हसन मुश्रीफ म्हणाले, दर महिन्याला कामाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे.
600 बेडचे जनरल हॉस्पिटल, 250 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल व 250 बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल असे मिळून 1100 बेडचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथे येत्या 22 महिन्यात उभे राहणार आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. इमारत प्रकल्प उपविभागाकडून नुकतेच शासकीय महाविद्यालयातील वीस कोटींच्या कोटींच्या ऑडिटोरियम हॉल इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उपाभियंता हेमा जोशी, अभियंता सारिका कुंभार यांच्यासह हॉस्पिटल सर्विसेस कन्सल्टन्सी कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते.
मुश्रीफांनी घेतला शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा
|