राजकीय
मुश्रीफांनी पंचवीस वर्षात ठराविक बगलबच्च्यांचे, चार ठेकेदारांच्या विकासाचे काम केले : बाबासाहेब पाटील
By nisha patil - 9/11/2024 11:16:46 PM
Share This News:
मुश्रीफांनी पंचवीस वर्षात ठराविक बगलबच्च्यांचे, चार ठेकेदारांच्या विकासाचे काम केले : बाबासाहेब पाटील
यमगेत समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ सभा
मुरगुड/प्रतिनिधी समरजीतसिंह घाटगे यांना एक संधी द्यावी. जनतेने यावेळी एकदा बदल करावा. तुम्हाला पश्चाताप होणार नाही. पंचवीस वर्षात सर्वसामान्यांचा विकासाऐवजी ठराविक बगलबच्च्यांचा तसेच चार ठेकेदारांचा विकास झाला. ठराविक लोकांच्या मक्तेदारीसाठी काम करणे चुकीचे आहे. टीका करण्यासाठी थोडीतरी लायकी लागते. असा घणाघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला.
यमगे (ता.कागल) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेचेच्या अध्यक्षस्थानी नारायण पेडणेकर होते. बाबासाहेब पाटील म्हणाले," राजे समरजितसिंह घाटगे यांच्याकडे कोणतीही सत्ता नाही. तरीही समाजाशी असणारे कर्तव्य म्हणून ते काम करत आहेत. युवकांना स्वावलंबी बनवण्याची काम त्यांनी केले आहे.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले," पालकमंत्री मुश्रीफ म्हणतात सात हजार कोटींची विकासकामे केली. या निधीमध्ये आरोग्य, शिक्षणासाठी किती निधी दिला याचा हिशोब त्यांनी जनतेला द्यावा. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणला म्हणता तर सर्वसामान्य गोरगरिबांच्या आरोग्यासाठी शासकिय दवाखान्यात असुविधा का. आपापसातल्या भांडणामुळेच मुश्रीफ सत्तेत आहेत. म्हणून आता एकत्र येणे गरजेचे आहे. तुमची साथ हवी आहे. आपल्यामध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत. एक संधी द्या कागलच्या विकासासाठी, आरोग्याच्या सुविधेसाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी.सुरेश कुराडे म्हणाले,"
मुश्रीफांनी केलेल्या सतराशे कोटी रुपयांच्या कामात सातशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. असे सांगणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याचे सत्तेचा दुरुपयोग करून निलंबन होते. यावरूनच त्यांनी केलेला भ्रष्टाचार उघड होतो. आपण सर्वजण शिवरायांचे मावळे आहोत. गनिमी काव्याने समोरच्याचा सुपडासाफ करूया. आणि स्वराज्याची नवी क्रांती घडवूया."
स्वागत व प्रस्ताविक रवींद्र लोकरे यांनी यावेळी शिवानी देसाई नवनाथ पाटील दत्ता वामा खराडे प्रवीण चौगुले संभाजी भोकरे सागर कोंडेकर शिवानंद माळी शिवाजी कांबळे सुरेश कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस विजय पाटील, विश्वजीत पाटील, अशोक पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सुळकुड, यमगे येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.
सच्चे मंडलिक प्रेमी मुश्रीफांचा हिशोब चुकता करतील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांना कागलची जनता दैवत मानते. त्यांनी आपल्या मुलग्याला बाजूला ठेवून मुश्रीफसाहेबांना आमदारकीची संधी दिली. त्याच बरोबर आमदार, मंत्रीही केले. त्या गुरुसमान मंडलिकांचा मुश्रीफांनी विश्वासघात केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर देवतासमान स्व.मंडलिकांना त्यांनी विमानातून ढकलून दिल असतं तर बरं झालं असतं अशी भावना व्यक्त केली.
त्यांच्याबद्दल तुम्ही वापरलेली ही भाषा सच्चा मंडलिक प्रेमी विसरलेला नाही. त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे संभाजी भोकरे यांनी केले.
मुश्रीफांनी पंचवीस वर्षात ठराविक बगलबच्च्यांचे, चार ठेकेदारांच्या विकासाचे काम केले : बाबासाहेब पाटील
|