बातम्या
गटारी अमावस्या निमित्त मटन चिकन दुकानात गर्दी
By nisha patil - 8/14/2023 4:03:04 PM
Share This News:
उद्या गटारी अमावस्या असल्या कारणाने व त्यानंतर श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यात उपवास असल्यामुळे एक महिनाभर मांसाहार टाळले जाते या पार्श्वभूमीवर रविवारी मटन चिकन मासे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती दिवसभरात कोल्हापूर शहर आणि परिसरात सुमारे 12 टन मटन 40,000 कोंबड्यांनी सहा टन मासे विक्री झाली सुट्टीचे दिवस असल्या कारणाने अनेकांनी नेहमीपेक्षा जादा मटन खरेदी करण्यावर भर दिला. शहराबरोबरच उपनगरातील ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या त्यानंतर सायंकाळी चिकन दुकानात गर्दी वाढत होती रात्री आठ वाजेपर्यंत चिकन दुकाने हाउसफुल होती यावेळी सागरी माशांना चांगली मागणी होती पापलेट झिंगा बांगडा असे मासे होते मटन 680 रुपये किलो चिकन 140 ते 180 रुपये किलो असा दर होता पापलेट 800 ते 1200 रुपये किलो तर बांगड्या 120 ते 160 रुपये किलो झिंगा 300 ते 500 रुपये किलो दर होता
गटारी अमावस्या निमित्त मटन चिकन दुकानात गर्दी
|