बातम्या

गोरगरिबांच्या विकासासाठीच माझी उमेदवारी

My candidature is for the development of the poor


By nisha patil - 10/27/2024 7:15:05 PM
Share This News:



गोरगरिबांच्या विकासासाठीच माझी उमेदवारी

वंसत पाटील यांचे प्रतिपादनः अफवावंर विश्वास ठेवू नका, आता माघार नाही
 

कोल्हापूरः प्रतिनिधी आजपर्यंत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये उपऱ्यांनीच प्रतिनीधीत्व केले आहे. मात्र आता आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी निवडावा यासाठीच मी निवडणुक रिंगणात असून अफवावंर विश्वास ठेवू नका, कोणत्याही परिस्थीत मी माघार घेणार नाही. गोरगरिबांच्या विकासासाठीच माझी उमेदवारी आहे असे प्रतिपादन वसंतराव जिवबा पाटील यांनी केले.

विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी कंदलगावचे सरपंच राहूल पाटील, रुपाली यादव,रोहिणी पाटील,संपत पाटील, रोहन देसूरकर, सरदार माने, धनाजी पाटील, संदीप पाटील, ओंकार रथकाडे,सागर पाटील  आदी उपस्थित होते.

वसंत पाटील म्हणाले, बाहेरच्यांनी येवून या मतदारसंघावर राज्य केले. स्वताच्या स्वार्थापलिकडे त्यांनी काही केले नाही. मुळातच या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करायला इथे लायक लोक नाहीत काय हा माझा सवाल आहे. आणि म्हणूनच स्थानिक उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर माझी भूमिका मांडण्यासाठी येणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींचे काय चालले आहे हे आपण पाहतच आहात. दररोज एकमेकांवर चिखलफेक करायची आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायची हा उद्योग या मंडळींचा चालू आहे. कुणीही उठतो आणि घटकपक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेतो. ही गोरगरिब, भोळ्या जनतेची फसवणूक सुरू असून तुमच्या घरातील उमेदवार म्हणून मला एक संधी द्या एवढीच विनंती करण्यासाठी या निवडणुक रिंगणात मी उभा आहे.

वसंत पाटील यांनी अतिशय साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करून मी जनतेतील एक आहे. त्यांच्यात आणि माझ्यात फरक नाही. आमचे नाते हे बंधुभावाचे असल्याचेही यावेळी दाखवून दिले.


गोरगरिबांच्या विकासासाठीच माझी उमेदवारी