बातम्या

पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील विजेच्या धक्क्याने मायलेकरांचा दुर्दैवी अंत

Mylekar met an unfortunate end due to lightning


By nisha patil - 6/29/2023 4:40:08 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टिम:  कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या नेवापूर गावात पेरणी करत असताना विद्युत तारेचा धक्का लागून माय लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 32 वर्षीय अजिंक्य गुंगा मगदूम अस मुलाचं तर 49 वर्षीय नंदा गुंगा मगदूम अशी या घटनेत मयत झालेल्या माय लेकराची नावे आहेत. या घटनेने बापू सह पन्हाळा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की अजिंक्य मगदूम हा सकाळी सात वाजता परिसरातील जमदाडकी नावाच्या शेतात पेरणीसाठी गेला होता. मात्र दुपार होऊन देखील अजिंक्य आला नसल्याने आई नंदा मगदूम यांनी शेतात जाऊन शोध घेतला यावेळी अजिंक्य हा विद्युत तारे जवळ निश्चित पडल्याचा दिसून आला यावेळी नंदा मगदूम यांनी त्याला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र विद्युत तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने नंदा मगदूम यांना देखील विजेचा मोठा धक्का बसला आणि त्यांचाही या ठिकाणी जागीच मृत्यू झालाय. दरम्यान महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे मायलेकरांचा बळी गेल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय या घटनेची माहिती मिळतात पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस अमलदार बाजीराव चौगुले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन छेदन करण्यासाठी पाठवले. आषाढी एकादशी दिवशी माय लेकरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पन्हाळा पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील विजेच्या धक्क्याने मायलेकरांचा दुर्दैवी अंत