बातम्या

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा घणाघात

NCP leader Sharad Pawar attacked minister Hasan Mushrif


By nisha patil - 8/26/2023 5:03:17 PM
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर येथील दसरा चौकात स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान शरद पवारांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला कोल्हापुरातल्या काही लोकांनी भूमिका बदलली ते ईडीला सामोरे जातील असं वाटलं होतं पण त्यांनी हिम्मत दाखवली नाही त्यांच्या भगिनींनी आम्हाला गोळ्या घाला असं ठणकण सांगितलं होतं मात्र त्यांच्या कुटुंबांच्या प्रमुखांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं असा जोरदार घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.याच पार्श्वभूमीवर हसनमुश्रीफ यांनी  प्रत्युत्तर दिले की नोट कमेंट्स. आम्ही अजितदादांसोबत का गेलो हे या आधीही सांगण्यात आले आमचा हा निर्णय पक्षाच्या विस्तारसाठी आहे हा आमचा सामूहिक निर्णय आहे याबाबतच्या चर्चा आमच्या दैवताबरोबर झाल्यात असं मुश्रीफ म्हणाले


मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा घणाघात