बातम्या
कागल: एसटी भाडेवाढ आणि स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
By nisha patil - 1/28/2025 7:17:02 PM
Share This News:
कागल: एसटी भाडेवाढ आणि स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
कागल, दि. 28 जानेवारी 2025: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एसटी भाडेवाढ, स्मार्ट प्रीपेड मीटर आणि कागलमधील धोकादायक अडथळ्यांसंबंधी विविध मागण्या केली. पक्षाच्या वतीने तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात कागलच्या नवीन सीमा तपासणी नाक्यावर उभारलेल्या सिमेंटच्या पक्क्या अडथळ्यांचे हटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. यामध्ये गेल्या आठवड्यात एक व्यक्ती जीवही गमावला होता.
दुसरीकडे, एसटी भाडेवाढीला विरोध दर्शवून, महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांवर अधिक भार न पडावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, वीज ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या निर्णयावर तीव्र विरोध दर्शवला आहे, कारण यामुळे ग्राहकांना अतिरिक्त खर्च होईल.
निवेदनावर कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, अजीतसिंह घाटगे, सुधाकर सुळकुडे, आणि इतर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. संबंधित अधिकारी या मागण्यांबाबत सकारात्मक असून, या समस्यांवर तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.
कागल: एसटी भाडेवाढ आणि स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
|