बातम्या
.. यापुढे गगनबावडा तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील-
By nisha patil - 3/14/2024 5:18:35 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे गगनबावडा : प्रतिनिधी गतकाळात आपल्याच पक्षातील नेत्यांनी स्वार्थापोटी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या इच्छेला दुसऱ्यांच्या दावणीला बांधल्यामुळे त्यांच्या वैचारिक मनोबलाचे खच्चीकरण झाले मात्र आता यापुढे आम्ही जुन्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असुन गगनबावडा तालुक्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी केले आज गगनबावडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी पक्ष बळकटीकरणासाठी तालुकास्तरावर नव्या युवकांना सामावून घेण्याचे तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले तर कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी गगनबावड्या सारख्या ग्रामीण भागात येऊन तळागाळातील जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्याशी संवाद साधणारे व्ही.बी पाटील हे राष्ट्रवादीचे पहिलेच जिल्हाध्यक्ष असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी गगनबावडा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, करवीर तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष पंडित कळके, गगन बावडा महिला अध्यक्ष सुचित्रा पडवळ, महिला सरचिटणीस विदुला पंडितराव, जिल्हा चिटणीस आनंदा जाधव, जिल्हा महिला उपाध्यक्ष सायरा जमादार, शब्बीर नाचरे याच्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी -कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.. यापुढे गगनबावडा तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील-
|