विशेष बातम्या
आदमापूर येथे NGO व CSR मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न
By nisha patil - 7/4/2025 4:03:15 PM
Share This News:
आदमापूर येथे NGO व CSR मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न
आदमापूर (ता. हातकणंगले) येथे महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था व CSR क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे आयोजन "त्रिवेणी हॉटेल", श्री बाळूमामा मंदिर शेजारी करण्यात आले होते.
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून डॉ. युवराज येडूरे यांनी NGO नोंदणी प्रक्रिया, CSR निधी मिळवण्याची पद्धत, कायदेशीर बाबी, 80G, 12A, FCRA, CSR1, निती आयोग नोंदणी, प्रस्ताव लेखन अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती दिली.
या कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो संस्थांनी सहभाग घेतला. संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन अंतर्गत ‘कोल्हापूर एनजीओ समिती’ची स्थापना करण्यात आली. ही समिती कायदेशीर सल्ला, निधी मार्गदर्शन, नेटवर्किंग यासाठी काम करणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोते यांनी केले आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास विविध सामाजिक संस्था, सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते.
आदमापूर येथे NGO व CSR मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न
|