बातम्या

कोल्हापुरातील इचलकरंजी, हुपरीत एनआयएची छापेमारी; तीन तरुण ताब्यात

NIA raids in Ichalkaranj


By nisha patil - 8/14/2023 3:56:47 PM
Share This News:



कोल्हापूर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एन आय एन ने कोल्हापुरातील इचलकरंजी हुपरी परिसरात छापेमारी करून तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. तरुणांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे, संबंधित तरुणाकडून काही कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. देशभरात विविध राज्यांतील १४ ठिकाणी अशी कारवाई करण्यात आली असून, यामध्ये कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दीड वर्षांपूर्वी कोल्हापुरातील सुभाष नगर परिसरात राष्ट्रीय तपास संस्थेने अशाच प्रकारची छापेमारी करून एका तरुणाला ताब्यात घेतले होते. आता पुन्हा राष्ट्रीय तपास संस्थेने कोल्हापुरातील इचलकरंजी हुपरी या ठिकाणी छापा टाकून दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत 35 वर्षीय तीन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लोखंडी साहित्य जप्त करण्यात आला असून कारवाई करताना गोपनीयता पाळण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यात कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात दोनदा राष्ट्रीय तपास संस्थेने छापेमारी केल्यामुळे दहशतवादी संघटनांशी या तरुणांचा संबंध असल्याचा संशय बळावला आहे.राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुणे येथून दहशतवादी असल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली होती. या दोघांचा शोध एनआयए पूर्वीपासून घेत होती. त्यांच्या केलेल्या चौकशीतून अनेक तथ्ये समोर आली. त्यांनी आंबोली आणि चांदोली येथील जंगलात स्फोटकांची चाचणी घेतली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी निपाणी, संगमेश्वर, आंबोली, चांदोली या परिसरात तपासणी करून संशयितांचा निवास कोठे होता, याचा शोध घेतला होता. हे दोघे संशयित पीएफआयशी संबंधित असल्याची शक्यता असल्याने, त्या अनुषंगाने ‘एनआयए’ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे.


कोल्हापुरातील इचलकरंजी, हुपरीत एनआयएची छापेमारी; तीन तरुण ताब्यात