बातम्या

नालासोपारा येथील घटनेने महाराष्ट्र हादरला...

Nalasopara incident shook Maharashtra


By nisha patil - 6/19/2024 1:42:40 PM
Share This News:



नालासोपारा येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेने एकच खळबळ उडाली त्याचे सोशल मीडियावर देखील पडसाद उमटत असून अनेकांनी संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत. नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव व आरती यादव या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. या भांडणातून रोहितने आरतीला अडवलं आणि दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहितनं आपल्याबरोबर आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात आरती गतप्राण झाली.दरम्यान, वसईतील या हत्येप्रकरणी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे संतापजनक पोस्ट शेअर केल्या आहेत. याप्रकरणातील आरोपी रोहित यादवला अटक करण्यात आली आहे. शिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर या भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


नालासोपारा येथील घटनेने महाराष्ट्र हादरला...