बातम्या

इचलकरंजी शहरामध्ये आज बकरी ईद निमित्त ईदगाह मैदान येथे नमाजपटन

Namazpatan at Eidgah Maidan today on the occasion of Bakri Eid in Ichalkaranji city


By nisha patil - 6/30/2023 12:55:42 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :इचलकरंजी शहरामध्ये आज बकरी ईद  निमित्त ईदगाह  मैदान येथे  नमाजपटन करण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार  घडू नये  यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांना मौलाना यांनी सर्व मुस्लिम बांधवांना नमाज पठाण करून प्रार्थना केली यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र  पंडित प्रांत अधिकारी मोसमी चौगुले अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील  समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदगाह   मैदान येथे सुमारे हजारो बांधवांनी सकाळच्या सुमारास येऊन नमाज अदा केली तसेच एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच हिंदू बांधवांनी ही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  महेंद्र  पंडित यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणताही  अनुचित प्रकार घडू नये  यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये 380 ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी मुस्लीम बांधव आले होते  यामध्ये सुमारे 1400  पोलीस कर्मचारी ६०० होमगार्ड तसेच दोन अप्पर पोलीस अधीक्षक दहा डी वाय एस पी तसेच 35 पोलीस निरीक्षक असा जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे आज शहरामध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली


इचलकरंजी शहरामध्ये आज बकरी ईद निमित्त ईदगाह मैदान येथे नमाजपटन