बातम्या
सौंदत्ती: नामदार हसन मुश्रीफ यांचा श्री रेणुकादेवीचे दर्शन
By Administrator - 2/17/2025 4:32:43 PM
Share This News:
सौंदत्ती: नामदार हसन मुश्रीफ यांचा श्री रेणुकादेवीचे दर्शन
सौंदत्ती,: नामदार हसन मुश्रीफ यांनी सौंदत्ती येथे श्री. रेणुकादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री. रेणुकादेवीच्या ओटीला भरून देवीच्या पूजा केली आणि आरती केली.
विधानसभा निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी दहा ते बारा गावांतील कार्यकर्त्यांनी श्री. रेणुकादेवीला नवस बोलला होता. तो नवस फेडण्यासाठीच श्री. रेणुकादेवीच्या यात्रेच्या काळात हसन मुश्रीफ सौंदत्ती येथे दाखल झाले होते आणि देवीच्या चरणी लीन झाले.
यावेळी श्री. रेणुकादेवी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सौंदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेगन्नावर, सौंदत्ती मंदिर समितीचे सचिव अशोक दुडगंटी, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सौंदत्ती: नामदार हसन मुश्रीफ यांचा श्री रेणुकादेवीचे दर्शन
|