बातम्या

कोल्हापुरातील महायुतीच्या संकल्प सभेत धडाडणार नामदार रामदास आठवलेंची तोफ

Namdar Ramdas Athawale s cannon will be fired at the resolution meeting of Mahayuti in Kolhapur


By nisha patil - 4/26/2024 9:19:42 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकीचे वारे साऱ्या देशभर असताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभांना वेग येत आहे.हा वेग कोल्हापुरातही मोठ्या ताकतीने असुन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार असणारे महायुतीचे संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार असणारे धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी सायंकाळी 5.00 वाजता कळंबा येथील तपोवन मैदानावर संकल्प सभा होत असून या सभेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नाम.रामदास आठवले हे देखील उपस्थित राहून  संजय मंडलिक व धैर्यशील माने त्यांच्या प्रचारार्थ यांना निवडून आणण्यासाठी आपली तोफ डागणार आहेत.

नाम.रामदास आठवले हे नेहमी राजकीय काव्य आणि आपल्या विद्रोही भाषणातून साऱ्या देशभर प्रसिद्ध आहेत. अशा रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टीही महायुती सोबत गेल्या दहा ते बारा वर्ष असून कोल्हापुरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष उत्तम  कांबळे यांचा हजारो कार्यकर्त्यांचा मोठा गट कार्यरत असून या गटाच्या माध्यमातून त्यांना मोठं मताधिक्य मिळेलच परंतु मागासवर्गीयांची बहुसंख्यांक मतं कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे या मतांसाठी नामदार रामदास आठवले हे काय बोलणार आणि कशा पद्धतीने मंडलिक व माने यांना मताधिक्य मिळवून देण्यात ते आणि त्यांची रिपब्लिकन पार्टी कार्यरत राहणार यासाठीच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या कोल्हापूरच्या संकल्प  सभेत येऊन मार्गदर्शन करणार असून या सभेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा सर्व तालुक्यांचे पदाधिकारी, युवक आघाडी, कामगार आघाडी महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कळंबा तपोवन मैदानावरती हजर राहावे असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी नियोजन बैठकीदरम्यान  केले.

या बैठकीला राज्य सचिव मंगलराव माळगे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, शहराध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी.आर. कांबळे, कामगार शहराध्यक्ष प्रदीप मस्के, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर,बाबासाहेब कागलकर,विश्वास सरूडकर, तानाजी कांबळे, जयपाल कांबळे, सचिन मोहिते, दिलीप कांबळे यांसहित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापुरातील महायुतीच्या संकल्प सभेत धडाडणार नामदार रामदास आठवलेंची तोफ