बातम्या
GBS आजाराकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा नाना पटोले यांचा आरोप
By nisha patil - 12/2/2025 6:11:46 PM
Share This News:
GBS आजाराकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा नाना पटोले यांचा आरोप
मुंबई, १२ फेब्रुवारी : राज्यात GBS (Guillain-Barré Syndrome) आजाराने महिनाभरात ८ मृत्यू झाले असून, सरकार अद्याप गांभीर्याने पावले उचलताना दिसत नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पटोले म्हणाले की, GBS रुग्णांची संख्या १७५ च्या वर गेली असून, ५० हून अधिक जण आयसीयूत आहेत. उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत २०,००० रुपये असल्याने सर्वसामान्यांना ते परवडत नाही. राज्य सरकारने या उपचारांसाठी विशेष तरतूद करावी आणि तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकार जनजागृती व उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
GBS आजाराकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा नाना पटोले यांचा आरोप
|