बातम्या

नणंद - भावजा निवडणूक रिंगणात भिडणार..?

Nanand  Bhavja will fight in the election arena


By nisha patil - 2/12/2023 4:44:04 PM
Share This News:



 राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन कर्जतमध्ये झाले. या अधिवेशनात बारामतीची जागा लढवण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. बारामतीत अजित पवार यांची बहिण सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडून उमेदवार असणार आहे. मग अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असणार? त्यावर चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे बारामतीत नणंद भावजय एकमेकांविरोधात लढणार की काय? अशी शक्यता आहे. परंतु अजित पवार यांनी प्लॅन बी तयार केला आहे. त्यात भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचे नाव आहे.
      पुणे जिल्ह्यात वर्चस्व मिळवण्यासाठी बारामती आणि शिरुरमध्ये आपल्या गटाचे खासदार असणे गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांचे आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उतरवल्यास निवडून येण्याची शंभर टक्के खात्री नाही. दौंड, खडकवासला, इंदापूर भागात अजित पवार यांची ताकद कमी आहे. तसेच सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरल्यास नणंद भावजय समोरासमोर येतील. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी अजित पवार हे सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरन्याची शक्यता कमी आहे.


नणंद - भावजा निवडणूक रिंगणात भिडणार..?