बातम्या

केंद्र सरकारकडून नरसिंह राव, चौधरी चरण सिंग ,शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

Narasimha Rao Chaudhary Charan Singh


By nisha patil - 9/2/2024 5:04:12 PM
Share This News:



 नवी दिल्ली: केंद्र सरकारने आज तीन लोकांना भारतरत्न सन्मान जाहीर केला. त्यात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंग आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली.

भारतरत्न पुरस्कारसंदर्भात X वर पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले जात आहे, हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले.आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.


केंद्र सरकारकडून नरसिंह राव, चौधरी चरण सिंग ,शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर