बातम्या

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खोचक निशाणा

Narayan Rane targets Uddhav Thackeray


By nisha patil - 3/5/2024 4:18:26 PM
Share This News:



आज कणकवलीत उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे.. यावरून नारायण राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. आता उद्धव ठाकरे जवळ 65 वर्षाचे झाले असून लवकरच ते निवृत्त होतील. त्यांच्यासाठी  कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवलं असल्याचा खोचक निशाणा राणेंनी लगावला.
 

नारायण राणे म्हणाले,  उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते मात्र ते काही करू शकले नाहीत. मी या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणलं, अनेकांना रोजगार दिले. आता उद्धव ठाकरे जवळ 65 वर्षाचे झाले असून लवकरच ते निवृत्त होतील. त्यांच्यासाठी मी कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे. लवकरच त्यांना त्या वृद्धाश्रमात पाठवणार आहे.
 

उद्धव ठाकरे आमच्यासाठी लकी आहेत. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कोकणात सभा घेतात तेव्हा तेव्हा आमचे मताधिक्य वाढते. आता देखील ते आमच्या कोकणात सभा घेत आहेत.  त्यामुळे आमचे मताधिक्य नक्की वाढेल असा विश्वास भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  एवढंच नाही तर तुमचा गाडीचा खर्च मी देतो पण तुम्ही कोकणात सभा घ्या असे नितेश राणे यावेळी म्हणालेत.


नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खोचक निशाणा