बातम्या

नाशिक हादरलं! अंगावरील दागिने लुटून महिलेची निर्घृण हत्या

Nashik shook Brutally killing a woman by robbing her body of jewellery


By nisha patil - 6/20/2023 5:32:28 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम नाशिक शहरातील जेल रोड, लोखंडे मळा भागातील हनुमंतनगर येथे ही घटना घडली आहे. सुरेखा उर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर असे या घटनेत मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. बेलेकर या लहान मुलगा दीपक व सून दीपाली यांच्यासह राहतात. तर मोठा मुलगा विवेक त्याच भागात पत्नीसह राहतो, दोघेही रविवारी कामावर गेले होते, तर दीपालीच्या भावाचे शुक्रवारी लग्न असल्याने ती माहेरी गेलेली असल्याने सुरेखा बेलेकर घरी एकट्याच होत्या. याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून हातातील दोन अंगठया व गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेल्याची घटना घडली. बेलेकर यांच्याघरी येणारा दूधवाला रात्री साडेआठच्या सुमारास दूध देण्यासाठी आला असता बेलेकर यांचा खून झाल्याचे समोर आले. हि 
रविवारची घटना असून बेलेकर या एकट्याच घरात असल्याचा फायदा घेत चोरटयांनी महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्यासाठी केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याच दिवशी रात्री दूधवाला आल्यानंतर त्याने आवाज दिला. मात्र घरातून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्याने शेजारच्यांना आवाज दिला. त्यांनतर शेजारच्या नागरिकांनी बेलेकर यांच्या जवळच राहणाऱ्या विवेकच्या घरी त्याच्या पत्नीला ही घटना सांगितली. त्यामुळे बेलेकर यांच्या सुनेने तत्काळ सासूच्या घरी जाऊन आवाज देत दरवाजा वाजवला, मात्र घरातून प्रतिसाद मिळाला नाही. याचवेळी काही जणांनी घराच्या मागे जाऊन पाहिले असता मागील दरवाजा उघडा दिसला. मागील दरवाजातून घरात पाहताच सुरेखा बेलेकर या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला होता. घटनेची माहिती मिळताच बेलेकर यांच्या दोन्ही मुलांनी घराकडे धाव घेतली, नातेवाईक व रहिवाशांनी त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले. 

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु 
दरम्यान बेलेकर यांच्या हत्येमुळे त्यांचे नातेवाईक व परिसरातील रहिवाशांना धक्का बसला असून या हत्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी न्यायवैद्यक शाळेचे पथक, ठसेतज्ज्ञ. श्वान पथक यांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली आहे. दिवसभराच्या तपासानंतर सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नव्हती. मात्र हनुमंतनगर येथे काही महिन्यांपूर्वी क्षत्रिय यांच्या घरी सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा चोsट्यांनी दहा तोळ्यांचे दागिने लंपास केले होते. तर वयोवृद्ध पी. एम. जाधव यांना बतावणी करून चोरट्याने सोन्याचे दागिने लुटून नेले होते. लूटमारीच्या उद्देशाने चोराने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सोन्याचे दागिने लुटून पोबारा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


नाशिक हादरलं! अंगावरील दागिने लुटून महिलेची निर्घृण हत्या