बातम्या

नाशिक ते पंढरपूर सायकलवारी, 350 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग,

Nashik to Pandharpur cycle ride participation of more than 350 cyclists


By nisha patil - 10/6/2023 9:03:40 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम पंढरपूरला सायकल रिंगण जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल असा होणारा जयघोष... ढोल ताशांचा होणारा गजर..... अन् पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाशिक सायकलपटू फाऊंडेशनचे 350 सदस्य पंढरपूर वारीसाठी रवाना झाले. याचबरोबर या वारीत जवळपास 55 महिला सायकलपचू  सहभागी होणार असून उद्या सायकलवारी पंढरपूरला पोहचणार आहेत. पंढरीच्या वारीसाठी वारकरी आसुसलेला असून आता नाशिकच्या सायकलपटू फाऊंडेशनच्या  माध्यमातून 350 हुन अधिक सायकलपटू पंढरपूरला रवाना झाले आहेत. नाशिक  सायकलपटू फाउंडेशनच्या वतीने आयोजित नाशिक पंढरपूर सायकल वारीला सकाळी इंदिरानगर येथील मनोहर गार्डन येथून सुरुवात झाली. सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सायकलवारीचे आयोजन करण्यात येते. विठू नामाच्या गजरात सकाळी इंदिरानगर येथून सायकल वारी निघाली संध्याकाळी सिन्नर राहुरी मार्गे अहमदनगर येथे मुक्कामी पोहचली. आज सकाळी सहा वाजता निघून करमाळा टेंभुर्णीमार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे. सर्व सायकलपटू उद्या पंढरपूरला एकत्र नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण व सायकल संमेलन घेणार आहेत. 
दहा वर्षांपूर्वी नाशिक  सायकलपटू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिष बैजल यांनी सायकल दिंडी ही संकल्पना मांडून प्रत्यक्ष अंमलात आणत सायकल दिंडी यशस्वी केली. तेव्हापासून आजतागायत अखंडपणे दहा वर्षे नाशिक सायकलपटू फाउंडेशनचे हौशी सदस्य मोठ्या हिरिरीने या दिंडीत भाग घेत असतात. आज नाशिक येथून भक्तिरसमय आणि पर्यावरणपूरक सायकल दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. दिंडी मार्गात हे सायकलपटू पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने संदेश देणार असून, यासाठी ठिकठिकाणी वृक्षारोपण तसेच झाडे लावा झाडे जगवा, हेल्मेटचा वापर, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव - आदी विषयांवर पथनाट्य देखील सादर करणार आहे. नाशिकसह राज्याच्या विविध ठिकाणांहून सायकल दिंडीत आलेले हे वारकरी 11 जून रोजी सायकलीने पंढरपूर नगरीची प्रदक्षिणा करणार आहेत. त्यानंतर एक-एक क्लब रेल्वे मैदानावर रिंगण करून उभे राहतील. 
सकाळी इंदिरानगर येथून सायकल वारी निघाली. त्यांनंतर संध्याकाळी सिन्नर राहुरी मार्गे अहमदनगर येथे मुक्कामी पोहचली. आज सकाळी सहा वाजता निघून करमाळा टेंभुर्णीमार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे. सर्व सायकलपटू उद्या पंढरपूरला एकत्र नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण व सायकल संमेलन घेणार आहेत. सायकलवारीत नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, सिन्नर, राहुरी, देवळा, सटाणा, चाळीसगाव, परभणी, कोपरगाव, लोणी, उमरगाव, लातूर, खडकवासला, इचलकरंजी, सोलापूर, कोरेगाव, सातारा, उंब्रज, माढा, कराड, कोल्हापूर, सांगली, नातेपुते, धुळे, ठाणे, नवी मुंबई, पुणे व इतर शहरातील सायकलपटू सहभागी होणार आहेत होत आहेत. रॅलीमध्ये प्रथमच नाशिक जिल्ह्यातून 55 महिला सहभागी झाले आहेत. यांच्याबरोबर 13 स्टॅंडम सायकलवर 25 दिव्यांग सायकली सहभागी झाले आहेत यामध्ये तीन अंध महिलांचा देखील समावेश आहे.


नाशिक ते पंढरपूर सायकलवारी, 350 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग,