बातम्या

नटरंगी नार अन् पैठणीचा साज... प्रार्थना बेहरेचा मनमोहक अंदाज

Natarangi naar and paithani saaz


By nisha patil - 7/14/2023 5:38:51 PM
Share This News:



नटरंगी नार अन् पैठणीचा साज... प्रार्थना बेहरेचा मनमोहक अंदाज

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.प्रार्थनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.कॉफी आणि बरंच काही, मितवा या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली.मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.'माझी तुझी रेशीम गाठ' या मालिकेमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीस आली. प्रार्थनाचे इन्स्टाग्रामवर दोन मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.प्रार्थनाचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रार्थनाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.


नटरंगी नार अन् पैठणीचा साज... प्रार्थना बेहरेचा मनमोहक अंदाज