बातम्या

एसी भारत सरकार आणि गार्गीज डीआयडी फाउंडेशन यांच्या मार्फत राष्ट्रीय पुरस्कार सोहळा ....

National Award Ceremony by AC Government of India and Gargis DID Foundation


By nisha patil - 11/22/2023 4:53:51 PM
Share This News:



एसी भारत सरकार आणि गार्गीज डी आय डी यांच्या वतीने कला- क्रीडा- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ मान्यवरांना एसी भारत सरकार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एसी भारत सरकार आणि गार्गीज डीआयडी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पुरस्कार सोहळा १९नोव्हेंबर २०२३ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल रेडियट येथे कला- क्रीडा- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ मान्यवरांना एसी भारत सरकार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गार्गीज डीआयडी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर म्याडी तामगावकर यांनी केले होते, तर या कार्यक्रमाचे निवेदन आर जे स्वप्निल पन्हाळकर यांनी केले.कळंबा कारागृहाचे उपअधीक्षक रावसाहेब आडे यांनी कार्यक्रमात पुरस्कर्तेना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.तसेच प्रमुख पाहुण्यांचे आभार डॉक्टर म्याडी तामगावकर यांनी मानले. त्यावेळी ते असे ही म्हणाले की, येत्या काळात एसी भारत सरकार यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यावेळी या कार्यक्रमात मध्यवर्ती कारागृहाचे उप अधीक्षक रावसाहेब आडे,एसी भारत सरकार पश्चिम महाराष्ट्र ऑफिसर विनायक गायकवाड, महाराष्ट्र कोल्हापूर डिव्हिजन ऑफिसर डॉक्टर  म्याडी तामगावकर, प्राध्यापक डॉक्टर प्रतीक मुंनगेकर, शिवराज पाटील, शैलेजा दनुंग हे उपस्थित होते.


एसी भारत सरकार आणि गार्गीज डीआयडी फाउंडेशन यांच्या मार्फत राष्ट्रीय पुरस्कार सोहळा ....