बातम्या
महावितरणला ऊर्जा परिवर्तनासाठी राष्ट्रीय पुरस्कार
By nisha patil - 2/26/2025 9:59:59 PM
Share This News:
महावितरणला ऊर्जा परिवर्तनासाठी राष्ट्रीय पुरस्कार
मुंबई, २६ फेब्रुवारी २०२५ - ऊर्जा परिवर्तन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे 'स्टेट लेव्हल एक्सलन्स ॲवॉर्ड इन एनर्जी ट्रान्झिशन' प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील ग्रीन एनर्जी समिटमध्ये हा पुरस्कार स्वीकारण्यात आला.
राज्यात नवीकरणीय ऊर्जेच्या वाढीसह वीजदर कमी करण्यावर भर दिला जात असून, २०३० पर्यंत हरित ऊर्जेचा वाटा ५२% होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेअंतर्गत कृषी पंप हरित ऊर्जेवर चालविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महावितरणला ऊर्जा परिवर्तनासाठी राष्ट्रीय पुरस्कार
|