शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय परिषद आजपासून...
By nisha patil - 2/27/2025 2:53:46 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय परिषद आजपासून...
'उद्योजकतेला प्रोत्साहन आणि सामाजिक समावेशन' या विषयावर राष्ट्रीय परिषद..
शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने २७ व २८ फेब्रुवारीस 'उद्योजकतेला प्रोत्साहन आणि सामाजिक समावेशन' या विषयावर मानव्यशास्त्र सभागृहामध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. या परिषदेचे उद्घाटन आज, गुरुवारी सुहास पालेकर यांच्या बीजभाषणाने होणार असून, कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी आहेत. या राष्ट्रीय परिषदेस देशभरातून प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. या परिषदेस प्राध्यापक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केलंय.
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय परिषद आजपासून...
|