विशेष बातम्या
शिवाजी विद्यापीठात गणित उपयोजनाबाबत राष्ट्रीय परिषद
By nisha patil - 3/3/2025 2:40:23 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात गणित उपयोजनाबाबत राष्ट्रीय परिषद
शिवाजी विद्यापीठात आजपासुन दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
शिवाजी विद्यापीठात गणित अधिविभागात ३ मार्चपासून 'नॅशनल कॉन्फरन्स ऑन अॅप्लिकेबल मॅथेमॅटिक्स २०२५' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे.
माजी कुलगुरू डॉ. एस. बी. निमसे बीजभाषण करतील. डॉ. एस. श्रीनिवास राव, डॉ. बी. उमा, डॉ. सचिनकुमार भालेकर, डॉ. बी. एस. देसले, डॉ. विनायक जोशी, डॉ. एस. ए. कात्रे आणि डॉ. एस. डी. नाईक यांची व्याख्याने होतील. ४५ संशोधक शोधनिबंध सादर करणार आहेत. या परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे समन्वयक डॉ. सुनील कुंभार यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठात गणित उपयोजनाबाबत राष्ट्रीय परिषद
|