बातम्या
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अल्लू अर्जुननं व्यक्त केल्या भावना
By nisha patil - 10/17/2023 7:07:21 PM
Share This News:
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर अभिनेता अल्लू अर्जुननं नाव आहे. अल्लू अर्जुननं खास लूकमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एन्ट्री केली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिलेल्या मुलाखतीमध्ये अल्लू अर्जुननं सांगितलं, "मी खूप आनंदी आहे आणि मला दुप्पट आनंद होत आहे कारण हा पुरस्कार एका व्यावसायिक चित्रपटासाठी मिळत आहे." डोळ्यावर चष्मा आणि व्हाईट आऊटफिट असा लूक अल्लू अर्जुननं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी केला आहे.अल्लू अर्जुनला पुष्पा द राइज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. आज हा पुरस्कार अल्लू अर्जुनला प्रदान करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अल्लू अर्जुननं व्यक्त केल्या भावना
|