बातम्या

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार

National Gold Award to Energy Department of Maharashtra


By nisha patil - 2/16/2025 10:50:06 PM
Share This News:



महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार

मुंबई, दि. १६ फेब्रुवारी २०२५ – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेला स्कोच सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार, तर महावितरणच्या सौर ग्राम योजनेला स्कोच रजत पुरस्कार मिळाला. नवी दिल्ली येथे महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

ही योजना शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत २०३ मेगावॅट क्षमतेचे ४९ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. २०२६ पर्यंत राज्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट आहे.

सौर ग्राम योजनेत आतापर्यंत सहा गावे सौर ग्राम बनली असून, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी हे पहिले सौर ग्राम ठरले आहे. या योजनेमुळे पर्यावरण संरक्षणासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे.


महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार
Total Views: 51