बातम्या
शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय एकात्मता शिबीर
By nisha patil - 2/14/2025 11:46:30 AM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय एकात्मता शिबीर
१२ राज्यांतील २१ विद्यापीठांचा सहभाग; विविध उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर, 13 फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 12 राज्यांतील 21 विद्यापीठांतील 210 एन.एस.एस. स्वयंसेवक आणि 21 संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत.
शिबिराचे उद्घाटन 16 फेब्रुवारी सायंकाळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होईल. शिबिरात योगासन, गटचर्चा, शिवजयंती शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व श्रमदान असे विविध उपक्रम आयोजित केले जातील. शिबिराचा समारोप 22 फेब्रुवारीला होईल.
शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय एकात्मता शिबीर
|