बातम्या

पेठ वडगांव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

National Lok Adalat on March 3 in Peth Vadgaon


By nisha patil - 2/23/2024 7:40:24 PM
Share This News:



पेठ वडगांव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

पेठ वडगांव : राष्ट्रीय लोक अदालतीचे रविवार दि.03 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता पेठ वडगांव दिवाणी व फोजदारी न्यायालयात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेठ वडगांव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.


तरी नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालती मध्ये जास्तीत जास्त प्रकरणे आपापसांत तडजोडीने मिटविण्यासाठी सहभाग घ्यावा असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगांव एल.एम.पठाण  यांनी केले आहे.


पेठ वडगांव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत