बातम्या

गोकुळ मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन व संविधान दिन साजरा

National Milk Day and Constitution Day celebrated in Gokul


By nisha patil - 11/26/2024 10:58:36 PM
Share This News:



डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ मार्फत अभिवादन ...
 गोकुळ मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन व संविधान दिन साजरा

  राष्‍ट्रीय दुग्ध दिन व दुग्धक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. वर्गीस कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून त्यांना गोकुळ परिवाराच्यावतीने अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच २६/११ च्‍या मुंबई येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍यातील शहिदांना गोकुळ परिवाराकडून आदरांजली ही वाहण्‍यात आलीयावेळी बोलताना संघाचे संचालक प्रकाश पाटील म्‍हणाले की, श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांची आज १०३ वी जयंती असून २०१४ पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. गोकुळच्या जडणघडणीमध्ये डॉ.कुरियन यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले असून त्यांच्या विचारानेच गोकुळची वाटचाल चालू असल्याचे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


गोकुळ मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन व संविधान दिन साजरा