बातम्या
शहाजी महाविद्यालयात शाश्वत विकास धोरणे व व्यवसायातील नवीन प्रवाह या विषयावर शनिवारी राष्ट्रीय चर्चासत्र
By nisha patil - 3/13/2024 8:31:37 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात शाश्वत विकास धोरणे व व्यवसायातील नवीन प्रवाह या विषयावर शनिवारी राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर:श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शनिवारी (दि.16) कॉमर्स विभागाच्या वतीने भारतातील शाश्वत विकास: धोरणे व व्यवसायातील नवीन प्रवाह या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन मंडळाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन यांचे भारतातील शाश्वत विकास यासंदर्भाने बीज भाषण होणार आहे. बेळगाव येथील केएलई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे प्रोफेसर डॉ. पी. एम. कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ.के.व्ही. मारुलकर,शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए.एम.गुरव यांचीही व्याख्याने या चर्चासत्रामध्ये होणार आहेत. भारतातील शाश्वत विकास धोरणे आणि व्यवसायातील विविध नवीन प्रवाह या विषयाच्या अनुषंगाने संशोधक , विद्यार्थी, प्राध्यापक हे संशोधनात्मक पेपर सादर करणार आहेत.
वाणिज्य शाखेतील आणि शाश्वत पर्यावरणाविषयी काम करणारे विद्यार्थी,प्राध्यापक ,संशोधक यांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे व सह समन्वयक डॉ.एम.ए.शिंदे यांनी केले आहे.
शहाजी महाविद्यालयात शाश्वत विकास धोरणे व व्यवसायातील नवीन प्रवाह या विषयावर शनिवारी राष्ट्रीय चर्चासत्र
|