खेळ

विवेकानंद मध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन ’ उत्साहात साजरा

National Sports Day celebrated with enthusiasm in Vivekananda


By nisha patil - 8/29/2024 7:40:05 PM
Share This News:



क्रीडा संस्कृती शासन स्तरापासून ते  पालक वर्गापर्यंत अधिक रुजली पाहिजे.  ऑलिम्पिक स्पर्धा ही सर्व देश एकत्रित येऊन बंधूत्व्‍ व सहचार्याने राहण्यासाठी आयोजित केली जाते.  त्यामुळे सर्व खेळाडूंच्या मध्ये समता, बंधूत्व्‍ , एकता व सहकार्याची भावना रुजली जाते.   असे विचार भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे मुख्य् प्रशिक्षक श्री. अजित पाटील यांनी मांडले.  ते विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.  मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त्‍ राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या आय.क्यु.ए.सी. विभाग व क्रीडा व शा.शिक्षण विभाग यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने करण्यात आले होते. ऑलिंम्पिक व क्रीडा संस्कृती या विषयावर प्रशिक्षक श्री. अजित पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार  म्हणाले, खेळाडूंनी क्रीडा व शिक्षण या दोन्हींची योग्य्‍ सांगड घातली तर चांगले करिअर होऊ शकते.  खेळामुळे आपले आरोग्य्‍  व शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहण्यास मदत होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून बोलताना प्रा.मेजर एम जी गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांनी जास्तीत खेळात भाग घेऊन खेळांचा प्रचार व प्रसार अधिक केला पाहिजे, त्यामुळे दैनंदिन जीवनात क्रीडा संस्कृती रुजण्यास खूप मदत होईल असे मत मांडले.  प्रा.स्नेहल वरेकर यांनी खेळाडू कसे घडतात याविषयी मनोगत मांडले. 

कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने व  मेजर ध्यानचंद व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे  यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक व स्वागत, पाहुण्यांचा परिचय  जिमखाना प्रमुख डॉ. विकास जाधव यांनी करुन दिला.  आभार प्रा.समीर पठाण यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा.संतोष कुंडले यांनी केले.  या कार्यक्रमास प्रा.किरण पाटील, प्रा.प्रशांत कांबळे, कॉलेजचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, डॉ. महेश कदम, श्री एस.व्ही.चरापले, प्राध्यापक, खेळाडू विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


विवेकानंद मध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन ’ उत्साहात साजरा
Total Views: 33