बातम्या
डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या डॉ.संग्राम पाटील, डॉ.गुरुनाथ मोटे यांना राष्ट्रीय पुरस्कार
By nisha patil - 10/25/2023 10:34:53 PM
Share This News:
डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाचे असोसिएट डीन डॉ. संग्राम पाटील व परीक्षा नियंत्रक डॉ.गुरुनाथ मोटे यांना ब्रँडमॅन संस्थेकडून श्री महात्मा गांधी राष्ट्रीय अभिमान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण पदमश्री जितेंद्र सिंग शंटी व प्रसिद्ध फॅशन डिसाईनर आस्मा गुलझार यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले.
शिक्षण व संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या रूपाने विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीतील शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
डॉ. संग्राम पाटील हे डेटा सायंटिस्ट असून गेली १७ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी १४ वर्षे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये देखील आपले योगदान दिले आहे. विकासाभिमुख, शिस्तप्रिय,उत्तम प्रशासक, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी अधिष्ठाता, परीक्षा नियंत्रक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे.
डॉ. गुरुनाथ मोटे यांनी गेली १५ वर्षे शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. फूड टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व समाजातील प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. डॉ. मोटे हे नेहमीच मूलभूत व समाजपयोगी संशोधनाला प्राधान्य देतात.
डॉ. पाटील व डॉ. मोटे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए. के. गुप्ता, कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन व कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दिल्ली:पदमश्री जितेंद्र सिंग शंटी व फॅशन डिसाईनर आस्मा गुलझार यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना डॉ. संग्राम पाटील, डॉ.गुरुनाथ मोटे
डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या डॉ.संग्राम पाटील, डॉ.गुरुनाथ मोटे यांना राष्ट्रीय पुरस्कार
|