बातम्या

राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघ प्रथम

National level project presentation competition D Y Patil Engineering Team First


By nisha patil - 3/3/2024 8:44:12 PM
Share This News:



राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघ प्रथम

कसबा बावडा कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित 'पायोनियर २०२४' या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभाग संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

 या स्पर्धेत ९ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने सहभाग घेतला होता. डी वाय पाटील अभियांत्रिकी च्या केमिकल विभागाचे विद्यार्थी सौरभ नालुगडे विनायक चव्हाण, महांतेश कोरे व आश्विन गायकवाड  यांच्या संघाने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. 

'सिंथेसिस ऑफ एमएन डॉप्ड निकेलफेराइट नॅनोपार्टिकल्स इन मॅग्नेटिक हायपरथेरमिया एप्लीकेशन्स: कोरिलेशन विथ स्ट्रक्चरल प्रॉपर्टीज' या विषयावर प्रकल्प त्यांनी सादर केला. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या या संशोधनाचे वैद्याकिय क्षेत्रामधील उपयुक्तता तज्ञां समोर सहउदाहरण विषद केले. या  वेळी त्यांचे सादरीकरण कौशल्य, सौशोधनाची व्याप्ती, त्यांच्या संशोधनाचे सामाजिक महत्व व उपयुक्तता, प्रश्न उत्तरे या सर्व बाबींचा विचार करून या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. 

 या विद्यार्थ्यांना प्राध्यापक किरण पाटील व डॉ. महेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, विभाग प्रमुख डॉ. के. टी. जाधव यांनी अभिनंदन केले.


राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघ प्रथम