बातम्या

राष्ट्रीय कुस्तीपटू दिसणार मोठ्या पडद्यावर

National wrestlers will be seen on the big screen


By nisha patil - 6/29/2024 7:31:01 PM
Share This News:



 प्रेमकथा, राजकारण, अॅक्शन असलेल्या रांगडा चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. येत्या 12 जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येईल. विशेष म्हणजे या सिनेमात दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
 

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेशदादा लांडगे आणि समस्त बैलगाडा मालक, पैलवान मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी "रांगडा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे.सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे रांगडा चित्रपटाचं मुख्य कथानक आहे. त्याशिवाय तगडे, बलदंड नायक, खलनायक, देखणी नायिका असल्यानं प्रेमकथा, राजकारण, तुफान अॅक्शनचा धडाकेबाज तडका या चित्रपटात आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचं कथानक आजवर अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर आलं असलं, तरी त्यात रांगडा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे.


राष्ट्रीय कुस्तीपटू दिसणार मोठ्या पडद्यावर