बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पुण्यातील सहा मतदारसंघांवर दावा

Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar


By nisha patil - 6/17/2024 8:20:38 PM
Share This News:



पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न झाली व या बैठकीनंतर पुणे  शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. 
 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पार पडली. पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. .


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पुण्यातील सहा मतदारसंघांवर दावा