बातम्या

इचलकरंजीत 23 फेब्रुवारी पासून नव तेजस्विनी महोत्सव; नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा

Nav Tejaswini Mahotsav from Ichalkaranjit February 23


By nisha patil - 2/19/2024 11:11:57 AM
Share This News:



इचलकरंजीत 23 फेब्रुवारी पासून नव तेजस्विनी महोत्सव; नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा 

 महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने 23 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत वर्धमान चौक, वंदे मातरम क्रीडांगण, इचलकरंजी येथे नव तेजस्विनी महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 23 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार असून इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त तैमूर मुलानी, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात माविम मार्फत राबविण्यात येत असलेल्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटांची उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री  होईल. सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. 
 

बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या मालाला व वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यसाठी या  महोत्सवाचे आयेाजन करण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड, इचलकरंजी महानगरपालिका, महिला व बाल विकास विभाग कोल्हापूर या कार्यालयांचे एकूण शंभर बचत गटाचे स्टॉल सहभागी होणार आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेले लोणची, पापड, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मसाले, गूळ, नाचणी, तांदूळ, मातीची नक्षीदार भांडी, साड्या, ज्वेलरी, महिला व लहान मुलांचे कपडे आणि खेळणी,  बिस्किटे, हर्बल प्रोडॉक्ट, हळद, बेदाणे  आदींसह विविध खाद्यपदार्थांची रेलचेल महोत्सवात असणार आहे.
   

 बचत गटातील महिलांना नवीन उद्योग व्यवसाय करण्याबाबतचे मार्गदर्शन व आर्थिक सहाय्यतेबाबत माहितीही यावेळी महिलांना माविम, शिवाजी विद्यापीठ व विविध बँकांच्या वतीने देण्यात येईल. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी केले आहे.


इचलकरंजीत 23 फेब्रुवारी पासून नव तेजस्विनी महोत्सव; नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा