बातम्या

नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार

Navjot Singh Sidhu will return to the cricket field again


By nisha patil - 3/19/2024 5:12:06 PM
Share This News:



 नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा एकदा क्रिकटच्या मैदानावर परतणार आहे. आगामी आयपीएल  स्पर्धेत नवज्योतसिंह सिद्धू समालोचकाची भूमिका निभावणार आहे. स्टार स्पोर्ट्सने फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 
 

नवज्योतसिंह सिद्धू यांनी  नुकतेच  लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता नवज्योतसिंह सिद्धू क्रिकेटच्या मैदानात परतणार आहेत. नवज्योतसिंह सिद्धू यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात ते राजकारणात सक्रीय राहणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  


नवज्योतसिंह सिद्धू यांनी पतियाळा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसची इच्छा होती. मात्र नवज्योतसिंह सिद्धू यांच्या या घोषणेने काँग्रेसची चिंता वाढली आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांचे पंजाबमधील काँग्रेस नेत्यांसोबतही चांगले संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनेकदा नवज्योतसिंह सिद्धू यांच्याविरोधात वक्तव्य करताना दिसून येतात. 11 फेब्रुवारी रोजी पंजाब काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली, 
 

ज्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीसाठी नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेसचे नेते आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. 22 मार्चला आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिली लढत होणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री ऑनलाइन होणार आहे. गेल्या वर्षी विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात पहिली लढत होणार आहे.


नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार