बातम्या

नवनीत राणा यांची अनोखी भाऊबीज, म्हणाल्या...

Navneet Rana s unique cousin said


By nisha patil - 11/16/2023 7:30:36 PM
Share This News:



अमरावतीचे खासदार नवनीत राणांनी सुरक्षा रक्षकांसोबत आपली भाऊबीज साजरी केली. नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानच आपल्या सख्ख्या भावापेक्षा कुठेही  कमी नाही. त्यामुळे त्यांच्यासोबतच मी भाऊबीज साजरी करत अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

राज्यासह देशभरात दीपावलीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच राजकीय नेते मंडळी देखील भाऊबीज साजरा करताना दिसली. अमरावतीचे खासदार नवनीत राणांनी सुरक्षा रक्षकांसोबत आपली भाऊबीज साजरी केली. त्या म्हणाल्या, भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा दिवाळीतला महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज, भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जात असतो. बहीण मोठ्या आनंदाने औक्षण करून भावाच स्वागत करत असते. नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानच आपल्या सख्ख्या भावापेक्षा कुठेही कुठेही कमी नाही. त्यामुळे त्यांच्यासोबतच मी भाऊबीज साजरी करत आहे, अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली. नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. ही सुरक्षा त्यांना पुरवणारे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक अधिकारी कर्मचारी वर्ग आणि महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना औक्षण करून कपाळी कुंकू लावून त्यांना नवनीत राणांनी ओवाळले आणि यंदाची भाऊबीज साजरी केली.


नवनीत राणा यांची अनोखी भाऊबीज, म्हणाल्या...