मनोरंजन

नवाजुद्दीन सिद्दीकी संपवणार होता स्वतःचं आयुष्य?

Nawazuddin Siddiqui was going to end his own life


By nisha patil -
Share This News:



बॉलिवूड अभिनेता नवाजूद्दीन सिद्दीकीचा   ‘जोगिरा सारा  हा सिनेमा 12 मे ला रिलीज होणार आहे. या सिनेमाआधी नवाजूद्दीन सिद्दीकीने मोठे खुलासे केले आहेत.नवाजुद्दीन सिद्दीकी स्वत:च आयुष्य संपवणार होता,याबाबत सतत मनात विचार यायचे असे तो म्हणाला आहे. पण यातून नंतर त्याने स्वत:ला सावरल्याचे देखील म्हटले आहे. तुम्ही अनेक पात्र साकारलीत, पण अशी कोणती पात्र आहेत, ज्यापासून तुम्हाला सुटका करणे खुप कठीण गेले असा सवाल नवाजूद्दीन सिद्दीकीला  विचारण्यात आला होता.यावर नवाजूद्दीन सिद्दीकी म्हणतो की,रमण राघवन, फोटोग्राफ हे माझ्यासाठी खुप कठीण सिनेमे होते. या सिनेमांची प्रक्रिया वेड लावणारी होती. जेव्हा मी रमण राघवन सिनेमा करत होतो, तेव्हा मला स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नव्हते. या दरम्यान शुटींगच्या आठवडाभर आधी मी लोणावळ्यात गेलो होतो. तिथे एका छोट्याशा जागेत राहिलो होतो.संध्याकाळ झाली की मला आरसा पाहून स्वत:चीच भीती वाटायची, मी इतका अस्वस्थ होऊन जाई की मला आयुष्य संपवण्याचे विचार मनात यायचे. यावेळी स्वत:ला खुप समजावण्याचा प्रयत्न केला. मी स्वत:ला घाबरू शकत नाही. मी आयुष्य संपवू शकत नाही, असे स्वत:ला समजावले.


नवाजुद्दीन सिद्दीकी संपवणार होता स्वतःचं आयुष्य?