बातम्या

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' चा ट्रेलर रिलीज

Nawazuddin Siddiquis Haddi trailer released


By nisha patil - 8/23/2023 7:32:17 PM
Share This News:



बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या  आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा हड्डी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपट ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील नवाजुद्दीनच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

हड्डी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच अनुराग कश्यप देखील दिसत आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला नवाजुद्दीन हा एका ट्रान्सजेंडरच्या लूकमध्ये दिसतो. नवाजुद्दीननं हड्डी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सूड कधी इतका थंड दिसला आहे का? हड्डी येत आहे, सूडाची कथा तुमच्या समोर मांडण्यासाठी' नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप यांच्यासोबतच हड्डी या चित्रपटामध्ये इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.


नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' चा ट्रेलर रिलीज