बातम्या

:27 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीननं केला किसिंग सीन

Nawazuddin did a kissing scene with an actress who is 27 years younger


By nisha patil - 6/15/2023 6:38:24 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लवकरच त्याचा 'टिकू वेड्स शेरू'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अभिनेत्री अवनीत कौर ही या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन आणि अवनीत कौर यांचा एक किसिंग सीन देखील आहे. हा किसिंग सीन पाहिल्यानंतर आता अनेक नेटकरी नवाजुद्दीनवर भडकले आहेत.49 वर्षीय नवाजुद्दीन सिद्दीकीनं 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटामध्ये त्याच्यापेक्षा 27 वर्षांनी लहान असलेल्या अवनीत कौरसोबत किसिंग सीन केल्यानं आता  नेटकरी भडकले आहेत. 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाच्या ट्रेलरमधील नवाजुद्दीन आणि अवनीत यांचा किसिंग सीन पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नवाजुद्दीन आणि अवनीत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, अवनीत कौर आणि नवाजुद्दीनचा तो सीन भयानक आहे. त्यांच्या वयातील अंतर 27 वर्षे आहे. उसके बाप की उमर का है ...'


:27 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीननं केला किसिंग सीन