बातम्या

महिला सक्षमीकरणासाठी कागल विधानसभेत परिवर्तनाची गरज-नवोदिता घाटगे

Need for change in Kagal Assembly for women empowerment


By nisha patil - 10/25/2024 7:15:40 PM
Share This News:



गडहिंग्लज / प्रतिनिधी.राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून समरजितसिंह  घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवित आहोत.महिला सक्षमीकरण व महिला सन्मानासाठी कागल विधानसभेत परिवर्तनाची गरज आहे.  सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेल्या समरजितसिंह घाटगे यांना उच्चांकी मतदानांनी निवडून देऊया.असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.

    गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे,वडरगे, लिंगनूर( क-नूल) आदी गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित विविध ठिकाणी झालेल्या महिला तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये त्या बोलत होत्या. या बैठकांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

     सौ.घाटगे पुढे म्हणाल्या,राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध लघु उद्योगांचे प्रशिक्षणपर कार्यक्रम तसेच इतर उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबविले आहेत. या प्रशिक्षणाबरोबर कर्ज सहाय्य व विक्री व्यवस्था याचेही नियोजन केले आहे.महिला सक्षमीकरणासाठीच्या समरजितसिंह घाटगे यांच्या उपक्रमांना बळ देण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना भरघोस मतदान करुन  उच्चांकी मताने निवडून देऊया 
   

यावेळी गीता तोडकर, वर्षा पाटील,अश्विनी पाटील, प्रियांका पाटील, महादेवी नाईक, सुनिता तोडकर,शशिकला पोडगावे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वागत प्रास्ताविक सुनंदा पोडगावे यांनी केले. अश्विनी काळे यांनी आभार मानले.कागल,गडहिंग्लज-उत्तूरच्या परिवर्तनात महिला आघाडीवर असतील यावेळी नवोदिता घाटगे म्हणाल्या,  समरजितसिंह घाटगे यांच्याकडे कोणतेही संविधानिक पद नाही.तरी देखील कागल विधानसभा मतदारसंघात विविध शासकीय योजना,ई लर्निंग सुविधा,बांधकाम कामगार योजना,निराधारांसाठी पेन्शन,महिलांसाठी आरोग्य शिबिरे, जातीचे दाखले अशा विविध माध्यमातून सर्वसमावेशक कामांचा राजेंचा धडाका सुरु आहे.आणखी चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे कामे करण्यासाठी आणि या विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी महिला आघाडीवर असतील.


महिला सक्षमीकरणासाठी कागल विधानसभेत परिवर्तनाची गरज-नवोदिता घाटगे