बातम्या
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ठोस आराखड्याची आवश्यकता
By nisha patil - 12/28/2024 11:16:38 PM
Share This News:
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ठोस आराखड्याची आवश्यकता
कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, दररोज लाखो लिटर सांडपाणी नदीच्या प्रवाहात मिसळत आहे. यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण सोडविण्यासाठी ठोस आराखडा राबवण्याची आवश्यकता पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. तसेच, यासाठी अमल महाडिक यांनी भरीव निधी देण्याची मागणी करण्यात आली. पंकजाताईंनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच कृती आराखडा तयार करण्याचा आणि प्रदूषणमुक्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा विश्वास दिला.असं आमदार अमल महाडिक यांनी सांगितले
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ठोस आराखड्याची आवश्यकता
|